Join us

मॉनी रॉय नव्हे तर आता या अभिनेत्री असणार नव्या नागिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 12:23 IST

नागिन ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ...

नागिन ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. या मालिकेची लोकप्रियता पाहाता या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता या मालिकेचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेची तयारी देखील सुरू झाली आहे. नागिन या मालिकेच्या पहिल्या दोन सिझनमध्ये प्रेक्षकांना मॉनी रॉयला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. या मालिकेतील मॉनीच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले होते.नागिन या मालिकेच्या तिसऱ्या सिझनची या कार्यक्रमाची निर्माती एकता कपूरने घोषणा केल्यानंतर या मालिकेतही मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना मॉनीला पाहायला मिळणार असेच सगळ्यांना वाटत होते. पण एकतानेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहून मॉनी या मालिकेच्या तिसऱ्या सिझनचा भाग नसल्याचे सांगितले होते. तिने पोस्टमध्ये म्हटले होते की, नवी नागिन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नागिनमधील मॉनी रॉय आणि अदा खान यांना आम्ही निरोप देत आहोत आणि नव्या नागिनचे आम्ही स्वागत करत आहोत. त्यावरूनच या मालिकेत मॉनी मुख्य भूमिकेत नसणार याची कल्पना मॉनीच्या फॅन्सना आली होती. मॉनीचा पत्ता कापल्यानंतर आता नागिनच्या तिसऱ्या सिझनमध्ये कोणती अभिनेत्री नागिनच्या भूमिकेत असणार याची उत्सुकता गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांना लागलेली होती. नागिनच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण आता एकतानेच घोषणा करून नवीन नागिन कोण असणार याबाबत सांगितले आहे. नागिनच्या तिसऱ्या सिझनमध्ये अनिता हसनंदानी आणि सुरभी ज्योती नागिनच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या दोघांची भूमिका काय असणार याविषयी लवकरच एकता सांगणार असल्याचे म्हटले जात आहे. अनिता हंसनंदानीने कभी सौतन कभी सहेली, कयामत, कसम से यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच कुछ तो है, कृष्णा कॉटेज, रागिनी एम एम एस यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत तर सुरभी ज्योतीला प्रेक्षकांना कबूल है या मालिकेत पाहायला मिळाले होते. Also Read : ​​मॉनीसोबत लग्न करण्याबद्दल पाहा मोहित काय म्हणतोय?