अनमोल मालिकेत काम करत नाहीये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 16:56 IST
अभिनेत्री अमृता रावने नुकतेच आरजे अनमोलसोबत लग्न केले. अमृता सध्या मेरी आवाजही पहेचान है या मालिकेत काम करत आहे. ...
अनमोल मालिकेत काम करत नाहीये
अभिनेत्री अमृता रावने नुकतेच आरजे अनमोलसोबत लग्न केले. अमृता सध्या मेरी आवाजही पहेचान है या मालिकेत काम करत आहे. अमृतानंतर अनमोलही छोट्या पडद्यावर आगमन करत असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत होत्या. अनमोल लाईफ का रिचार्ज या मालिकेत काम करणार असल्याचेही म्हटले जात होते. पण मी कोणत्याही मालिकेत काम करत नाही असे अनमोलने म्हटले आहे. अशाप्रकारच्या बातम्या कोण पसरवतेय हेच मला कळत नाही असेही अनमोलचे म्हणणे आहे.