Join us
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..! 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून एक, दोन नाही तर चक्क चार कलाकारांनी घेतला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 17:13 IST

Sundara Manamadhye Bharli:'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडल्याचे सांगण्यात येत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेने अनेक उच्चांक गाठले असले तरी या मालिकेचा टीआरपी घसरल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचे कारण आता समोर आले आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडल्याचे समजते आहे.

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेमध्ये लतिका आणि अभ्या यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे. लतिका ही भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक हिने साकारलेली आहे. तर अभ्याची भूमिका समीर परांजपेने निभावली आहे. अक्षया नाईक हिने या मालिकेमध्ये एका जाडजुड मुलीची भूमिका साकारली आहे. लतिका आणि आभ्या यांची लव्ह स्टोरी या मालिकेमध्ये दाखवत असताना ते दोघे वेगळे होत असल्याचे देखील दाखवण्यात आले. या मालिकेमध्ये अतिषा नाईक यांनी देखील अतिशय जबरदस्त असे काम केले आहे. त्यांची भूमिका ही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेमध्ये लतिकाच्या बापूंची भूमिका अभिनेते उमेश दामले यांनी साकारली आहे, तर सज्जनराव, दौलत यांच्या देखील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहेत.

चार कलाकारांनी सोडली मालिकासुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील तब्बल चार कलाकारांनी ही मालिका सोडल्याचे सांगण्यात येत आहे. मालिका सोडलेल्यामध्ये अभ्याच्या वहिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रणिती नरकेचा समावेश आहे. प्रणितीच्या चेहऱ्यावर ॲलर्जी झाल्यामुळे तिने ही मालिका सोडली होती. त्याचप्रमाणे दौलतच्या आबाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते धनंजय वाबळे यांनी देखील ही मालिका काही कारणामुळे सोडली. त्यानंतर लतिकाच्या बहिणीची भूमिका साकारणारी गौरी किरण हिने मालिका सोडलेली आहे. ती सध्या तुझ्या रूपाचं चांदणं या मालिकेत दिसत आहे. तर या मालिकेत मिस नाशिक म्हणजेच कामिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा पुरंदरे हिने देखील मालिकेतून निरोप घेतल्याचे समजते आहे. या कलाकारांनी मालिका सोडण्यामागचे कारण वेगवेगळे आहे.