Join us
Daily Top 2Weekly Top 5

करिना अनुष्काच्या नाही तर 'या' अभिनेत्रीच्या बाळाच्या फोटोने वेधून घेतले जास्तीत जास्त चाहत्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 14:43 IST

करिना आणि अनुष्काने अजूनपर्यंत बाळाचा चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो शेअर केला नाहीय. मात्र अनिता हंसनंदानीने चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटो शेअर केला आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून अनुष्काची मुलगी वामिका आणि करिनाच्या मुलाची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. नेहमीच चाहते यांच्या मुलांची झलक कधी पाहायला मिळणार याविषयी कमेंट्सच्या माध्यमातून विचारत असतात. मात्र अजूनतरी चाहत्यांची या मुलांना पाहण्याची इच्छा काही पूर्ण झालेली नाही.

 

महिला दिनानिमित्त अनुष्का आणि करिना दोघांनीही त्यांच्या मुलांचे चेहरे न दाखवताच झलक दाखवली आणि चाहत्यांनीही भरभरुन लाईक्स कमेंटचा वर्षाव केला. मात्र या सगळ्यात आणखी एक अभिनेत्री आहे. तिने नुकतीच तिच्या बाळाची झलक दाखवली.अनिताने  बाळाबरोबर शेअर केलेल्या या फोटोमध्ये  मस्त मदरहु़ड एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. पती रोहितसुद्धा बाळाची काळजी घेण्यात अनिताला मदत करत असतो. 

अनिता हंसनंदानीने नुसतीच झलकच नाही तर बाळाचा चेहरा स्पष्ट दिसेल असा फोटोच तिने चाहत्यांसह शेअर केला आहे. अनिता ९ फेब्रुवारीला बाळाला जन्म दिला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनिताने आपल्या गरोदरपणाची माहिती चाहत्यांना दिली होती. मुळात ती गरोदर असल्यापासून ते बाळाचा जन्मापर्यंतच्या सगळ्याच घडामोडी ती चाहत्यांसह शेअर करताना दिसली. त्यामुळे अनुष्का आणि करिना यांनी मुलांची झलक दाखवली नसली तरी अनिताने मात्र बाळाच्या जन्माच्या अवघ्या काही दिवसात चाहत्यांसह फोटो शेअर केला होता. 

अनिताने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.'कभी सौतन, कभी सहेली', 'ये हैं मोहब्बते', 'नागीन 3' या मालिकेतील तिच्या भूमिका प्रचंड गाजल्यात. 2013 मध्ये अनिताने रोहित रेड्डीसोबत लग्न केले होते.लग्नाच्या सात वर्षानंतर या कपलच्या आयुष्यात बाळाची एंट्री झाली आहे. सध्या अनिता आणि रोहित दोघेही त्यांच्या बाळासह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहेत. अनिता व रोहितने मुलाचे नाव आरव असे ठेवले आहे. 

टॅग्स :अनिता हसनंदानीअनुष्का शर्मा