नामकरणमध्ये सोनल वेंगुर्लेकर नव्हे तर वृषिका मेहता दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:45 IST
नामकरण ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत अनेक नवीन कलाकारांचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत सध्या छोट्या ...
नामकरणमध्ये सोनल वेंगुर्लेकर नव्हे तर वृषिका मेहता दिसणार
नामकरण ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेत अनेक नवीन कलाकारांचा प्रवेश होणार आहे. या मालिकेत सध्या छोट्या दाखवल्या जाणाऱ्या रिया आणि अवनी या दोघी मोठ्या झालेल्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लीपनंतर सोनल वेंगुर्लेकर आणि नलिनी नेगी प्रेक्षकांना अवनी आणि रिया या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता या दोघीही या मालिकेचा भाग नसल्याचे कळतेय. मालिका सुरू होण्यापूर्वीच त्या दोघींना डच्चू देण्यात आला आहे. नामकरण ही मालिका प्रचंड प्रसिद्ध असून या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी बरखा बिष्टने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती. पण मालिकेच्या कथानकानुसार ती साकारत असलेल्या आशा या व्यक्तिरेखेचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता तिच्याच ताकदीच्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री अवनी आणि रिया या भूमिकेसाठी आणण्याचा प्रोडक्शन हाऊस विचार करत आहे. सोनल आणि नलिनी या तितक्या प्रसिद्ध नसल्याने या भूमिकांसाठी आता त्यांचा विचार करण्यात येत नाहीये. डीथ्री या कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली वृषिका मेहताचा अवनी अथवा रिया या भूमिकेसाठी विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. वृषिका नुकतीच इश्कबाज या कार्यक्रमात झळकली होती. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. पण वृषिका कोणती भूमिका साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. ती रिया ही भूमिका साकारणार असल्याचे कळतेय. पण त्यातही प्रोडक्शन हाऊसला अवनीच्या भूमिकेसाठी एखादी चांगली आणि प्रसिद्ध अभिनेत्री न मिळाल्यास वृषिकाच अवनी साकारेल आणि रियाच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार करण्यात येईल अशीदेखील सध्या जोरात चर्चा सुरू आहे.