Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रेमाच्या चौकात कितीही फिरा...", अभिषेकने सोनालीसाठी घेतला हटके उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 13:41 IST

Abhishek Gaonkar And Sonali Gurav : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकरने त्याची गर्लफ्रेंड रिल स्टार सोनाली गुरवसोबत २६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला.

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील श्रीनू म्हणजेच अभिनेता अभिषेक गावकर(Abhishek Gaonkar)ने त्याची गर्लफ्रेंड रिल स्टार सोनाली गुरव(Sonali Gurav)सोबत २६ नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. कोकणातील निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात त्यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लग्नानंतर अभिषेक आणि सोनालीने लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्या दोघांनी हटके उखाणा घेतला. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेता अभिषेक गावकर आणि सोनाली गुरव यांनी अलिकडेच 'लव्ह गेम लोचा' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी हटके उखाणाही घेतला. त्यांच्या या उखाण्याच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. उखाणा घेताना सोनाली म्हणाली की, ''उखाणा घेते एकदम इजी, अभिषेक असतो शूट्समध्ये बिझी.'' तिच्या उखाण्यावर अभिषेक म्हणाला, ''खूपच खरं बोलली. त्यानंतर अभिषेकने उखाणा घेतला. तो म्हणाला की, प्रेमाच्या चौकात कितीही फिरा, सापडणार नाही तुम्हाला वामिकासारखा हिरा.'' लग्नानंतर अभिषेकने सोनालीचं नाव वामिका ठेवले आहे.

अभिषेकने का ठेवलं सोनालीचं वामिका नाव? 'लव्ह गेम लोचा' शोमध्ये अभिषेकने लग्नानंतर सोनालीचे नाव का बदलले, याबद्दल सांगितले. सोनाली म्हणाली की, वामिका हे नाव अभिषेकला खूप आवडलं आणि तो म्हणाला की माझ्या मुलीचे नाव हे ठेवणार. वामिकाचा अर्थ होतो लक्ष्मी. नंतर एक दिवस त्यालाच असे वाटले की, सोनाली तू माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप लक्ष्मी आली. त्यामुळे लग्नानंतर तुझे नाव वामिका ठेवूयात.

त्यावर अभिषेक म्हणाला की, तिला आधी मी विचारले की लग्नानंतर तुला नाव बदलायचे आहे का? ती म्हणाली की, जर बदलायचे असेल तर चांगलं नाव सुचव जर आवडलं तर नक्कीच नाव बदलेन. तेव्हा मी तिला वामिका नावाबद्दल सांगितले आणि तिचे हे नाव का ठेवायचे तेही सांगितलं. तर तिला हे नाव आवडलं आणि सोनालीची वामिका झाली.