Join us

नो डान्स प्लीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 10:52 IST

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर मजाक मजाक में या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. शोएब हा खूप चांगला बॉलर ...

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर मजाक मजाक में या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. शोएब हा खूप चांगला बॉलर आहे. आज क्रिकेट जगतात त्याचे खूप मोठे नाव आहे. पण शोएब एका गोष्टीला खूपच घाबरतो. नृत्याचे अथवा गाणे गाण्याचे नाव घेताच त्याच्या पोटात गोळा येतो असे तो सांगतो. अनेकवेळा रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांसोबत परीक्षकही गाणे गाताना, थिरकताना दिसतात. त्यामुळे मजाक मजाक हा कार्यक्रम स्वीकारतानाच मी कार्यक्रमात नृत्य करणार नाही अाणि गाणेही गाणार नाही असे शोएबने निर्मात्यांना सांगितलेले होते. एवढेच नव्हे तर शोएबने त्याच्या करारामध्येदेखील ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे.