Join us
Daily Top 2Weekly Top 5

नियती फटनाणी 'या'कारणासाठी उच्चराले संस्कृत मंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 16:01 IST

पियाला (नियती फटनाणी) आपल्यातील दैवी शक्तींची जाणीव होते आणि त्यामुळे सैतानी शक्तींपासून अंशचे (हर्ष राजपूत) रक्षण करण्यासाठी ती तांडव नृत्य करते आणि नंतर एक देवी म्हणूनच प्रकट होते.

‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ मालिका ही प्रेक्षकांची आवडती बनली आहे. आता मालिकेतील नवरात्राच्या प्रसंगांमध्ये पियाच्या (नियती फटनाणी) तांडव नृत्यामुळे मालिकेतील कुतुहल आणि थरार अधिकच वाढणार आहे.

पियाला (नियती फटनाणी) आपल्यातील दैवी शक्तींची जाणीव होते आणि त्यामुळे सैतानी शक्तींपासून अंशचे (हर्ष राजपूत) रक्षण करण्यासाठी ती तांडव नृत्य करते आणि नंतर एक देवी म्हणूनच प्रकट होते. या कथाभागात प्रेक्षकांना नियती यापूर्वी कधीच दिसली नव्हती अशा रूपात दिसणार आहे. या कथानकासाठी नियतीला काही संस्कृत मंत्र तोंडपाठ करावे लागले होते. नियती सांगते, “या तांडव नृत्यासाठी मला त्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे समरस व्हावं लागलं आणि नंतर तांडव नृत्यातून ही व्यक्तिरेखा जिवंत करावी लागली होती. या नृत्याचा प्रत्येक पदन्यास काही संस्कृत मंत्रांवर आधारित असल्याने मला त्या प्रत्येक संस्कृत शब्दांचा अर्थ लक्षात घेणं गरजेचं होतं. मला जेव्हा सांगितलं गेलं की मला हे नृत्य काही संस्कृत मंत्रोच्चारांवर करायचं आहे, तेव्हा मी संस्कृतचे काही मूलभूत नियम समजावून घेतले आणि या मंत्रांचा अर्थ काय आहे, ते जाणून घेण्यासाठी काही धडे घेतले. त्यामुळे मला हे नृत्य सकारणं सोपं गेलं. संस्कृत ही तशी गुंतागुंतीची भाषा आहे. त्यामुळे ती शिकणं हेही माझ्यापुढे एक आव्हानच होतं. तरीही मी या नृत्यात मी माझं सर्वस्व ओतलं. हा एक तणावपूर्ण प्रसंग असून त्यात पिया आपलं दुर्गादेवीचं रूप प्रथमच प्रकट करते. हा सारा भाग खूपच प्रेक्षणीय झाला आहे.” कथानक जसे पुढे सरकेल, तसे प्रेक्षकांना काही अनपेक्षित धक्के बसतील आणि काही अद्भुत गोष्टी पाहायला मिळतील!

टॅग्स :नजर