निया शर्माचा लहानपणीचा फोटो आला समोर?नेटीझन्सकडून मिळतायेत अशा प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 14:21 IST
टीव्ही अभिनेत्रींमध्ये सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते.तिच्या ग्लॅमरस लूक्समुळे दिवसेंदिवस निया शर्माची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे ...
निया शर्माचा लहानपणीचा फोटो आला समोर?नेटीझन्सकडून मिळतायेत अशा प्रतिक्रिया
टीव्ही अभिनेत्रींमध्ये सर्वात सेक्सी अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते.तिच्या ग्लॅमरस लूक्समुळे दिवसेंदिवस निया शर्माची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे नियाच्या प्रत्येक फोटोला चाहते सोशल मीडियावर तिच्या फोटोला लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतात.सध्या निया खतरों के खिलाडी पर्व 8मध्ये बिझी असली तरीही ती तिच्या ग्लॅमरस फोटोमुळेच जास्त चर्चेत असते.खरंतर निया 'जमाई राजा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचली. मालिका बंद झाल्यानंतर ती वेगवेगळ्या गोष्टी करत रसिकांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न केला.तसेच ती नवनवीन बोल्ड फोटोशूट करत नेहमी चर्चेत असते. सध्या नियाचा एक फोटो व्हायरल झाला आहे.मात्र या फोटोत दिसणारी मुलगी निया शर्माच आहे का असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही.कारण हा निया शर्माचा हा बालपणीचा फोटो आहे. फोटोत निया खूप गोड दिसत असून तिच्या या फोटोला नेटीझन्स खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स देत आहेत.डिसेंबर 2016 मध्ये निया शर्माला एशियाची तिसरी सेक्सी महिला हा किताब मिळाला होता.त्यानंतर ती तिच्या लूक्स आणि स्टाइलवर जास्त मेहनत घेताना दिसली. आता पार्टी असो किंवा अवॉर्ड शो या सगळ्या सोहळ्यांमध्ये निया सगळ्यांसाठी आकर्षण ठरते. 'काली एक अग्निपरीक्षा' या मालिकेतून निया शर्माने छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री मारली. 'बहनें' आणि 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकांमधून नियाने आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र 'जमाई राजा' या मालिकेने नियाला खरी लोकप्रियता आणि ओळख मिळवून दिली. तिने साकारलेली रोशनी सा-यांनाच भावली.