Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लागिर झालं जी' फेम नितीश चव्हाण पडला प्रेमात? ती आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 07:15 IST

मालिकेनंतर नितीशने त्याचा मेकओव्हरच केला आहे. कुण्या आघाडीच्या मॉडेलला लाजवेल असा डॅशिंग, रॉकिंग आणि कूल अंदाज तरुणींना घायाळ करेल.

फौजीच्या जीवनावरील आधारित 'लागिर झालं जी' या मालिकेत अजिंक्य आणि शीतल यांची लव्हस्टोरी छोट्या पडद्यावर हिट ठरली. मालिका बंद झाली असली तरी रसिकांच्या मनात आजही अजिंक्य अर्थात नितीश चव्हाण विषयी विशेष प्रेम आहे. सोशल मीडियावरील त्याच्या प्रत्येक अपडेट त्याचे चाहत्यांसह तो शेअर करतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तर तुफान व्हायरल होत असतात. मात्र या सगळ्यात त्याने शेअर केलेला एक फोटोने सा-यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तो एका तरूणीसह दिसत आहे. आता नेमकी नितीश बरोबर असलेली तरूणी आहे तरी कोण? तो प्रेमात तर नाही ना? त्याने त्याच्या प्रेमाची दिलेली ही कबुली तर नाही ना? असे अनेक प्रश्न चाहते विचारताना दिसतायेत. फोटोत दिसणारी सुंदर तरूणीचे नाव आहे श्वेता खरात. श्वेता सध्या  'राजा राणीची गं जोडी' मालिकेत झळकत आहे.

नितीश चव्हाण आणि श्वेता खरात हे बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. मोकळ्या वेळात  दोघे फिरायला जातात त्यामुळं श्वेता आणि नितीशचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगत आहेत.  या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. दोघेही एकमेकांना डेट करत असून  चोरी चोरी चुपके चुपके प्रेमप्रकरण सुरु असल्याचे बोलले जात आहे. यावर अजूनतरी नितीशने मौनच राखले आहे. 

मालिकेनंतर नितीशने त्याचा मेकओव्हरच केला आहे. कुण्या आघाडीच्या मॉडेलला लाजवेल असा डॅशिंग, रॉकिंग आणि कूल अंदाज तरुणींना घायाळ करेल. टी-शर्ट, स्टायलिश जीन्स आणि आकर्षक अशी बॉडी असा अंदाज असलेले त्याचे फोटो खास आणि तितकेच आकर्षक आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब नितीशने ही चांगलीच फॉलो केली आहे. त्याच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे त्याच्या ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत आहे. 

टॅग्स :नितीश चव्हाण