Join us
Daily Top 2Weekly Top 5

लागिरं झालं जी फेम अज्याची खऱ्या आयुष्यातली शितली पाहिलीत का?, नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 07:00 IST

फौजीच्या जीवनावरील आधारित 'लागिर झालं जी' या मालिकेत अज्या आणि शीतलची लव्हस्टोरी छोट्या पडद्यावर हिट ठरली होती.

फौजीच्या जीवनावरील आधारित 'लागिर झालं जी' या मालिकेत अज्या आणि शीतलची लव्हस्टोरी छोट्या पडद्यावर हिट ठरली होती. मालिका बंद झाली असली तरी रसिकांच्या मनात आजही अजिंक्य अर्थात नितीश चव्हाण विषयी विशेष प्रेम आहे. सोशल मीडियावरील त्याच्या प्रत्येक अपडेट त्याचे चाहत्यांसह त शेअर करतो. त्याचे फोटो आणि व्हिडीओ तर तुफान व्हायरल होत असतात. बऱ्याच व्हिडीओमध्ये एक मुलगी नितीशसोबत कपल डान्स करताना दिसते.  आता नेमकी नितीश बरोबर असलेली तरूणी आहे तरी कोण? तो प्रेमात तर नाही ना?  याची चर्चा फॉलोअर्समध्ये रंगली आहे.  नितीशने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्वेतासोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

नितीशसोबत दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री श्वेता खरात आहे. श्वेता सध्या 'राजा राणीची गं जोडी' मालिकेत झळकत आहे. या मालिकेत ती संजीवनीची मैत्रिण मोनाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिचं चांगलंच कौतुक होत आहे. अभिनेत्री  श्वेता ही एक खूप चांगली डान्सर आहे.

नितीश-श्वेताची जुनी मैत्री लागिरं झालं जी मालिकेचं चित्रिकरणही साताऱ्यात व्हायचं. नितीशप्रमाणेच श्वेता खरातही मूळ साताऱ्याचीच आहे.

टॅग्स :नितीश चव्हाण