'गणपती बाप्पा मोरया' मालिकेती विष्णुची भूमिका साकराणार निरंजन कुलकर्णीला मेकअपसाठी लागतात 5 तास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 15:58 IST
मालिकांमध्ये वापरण्यात येणारे ग्राफिक्स असो... वा संवाद बोलताना बाप्पाची हलणारी सोंड असो, आदिशक्तीचं भव्य रुप असो किंवा श्रीविष्णूंच्या विविध ...
'गणपती बाप्पा मोरया' मालिकेती विष्णुची भूमिका साकराणार निरंजन कुलकर्णीला मेकअपसाठी लागतात 5 तास
मालिकांमध्ये वापरण्यात येणारे ग्राफिक्स असो... वा संवाद बोलताना बाप्पाची हलणारी सोंड असो, आदिशक्तीचं भव्य रुप असो किंवा श्रीविष्णूंच्या विविध अवतारांची गाथा असो, पृथ्वी प्रदक्षिणा, गणेशाची मुंज, वेगवेगळ्या मेक अपसह महादेवांचं पंचमुखी रुप,असे अनेक माईल स्टोन्स ह्या मालिकेने गेल्या दीड वर्षांत दिले आहेत.त्यामुळेच आणखी एक अभिनव आयडीयाची कल्पना लवकरच गणपती बाप्पा मोरया मालिकेत पाह्यला मिळणार आहे... सध्या मालिकेत सुरू असलेल्या सती गाथेमध्ये पद्मनाभ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा प्रसंग दाखवण्यात येणार आहे. त्यात प्रथमच मालिकेत श्रीविष्णूंची भूमिका करणाऱ्या कलाकाराला बॉडी पेन्ट करुन मूर्तीच्या रूपात एक तासाच्या विशेष भागात सादर करण्यात येणार आहे.यासाठी विष्णुची भूमिका साकरणार्या कलाकाराला (निरंजन कुलकर्णी) शूटिंग संपेपर्यंत मूर्तीरूपात बसावे लागते. यासाठी मेकअपला करायला तब्बल 5 तासा लागतात.'गणपती बाप्पा मोरया' या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळेच वळण मिळणार आहे.पार्वतीचं मन प्रसन्न करण्यासाठी महादेव तिने व्यक्त केलेल्या एका अटीची पूर्तता करायला सहा ऋतूमध्ये जाऊन, त्या त्या ऋतूतली फुलं वेचून त्यांचा गजरा आपल्या प्रिय पत्नी साठी आणायचं मान्य करतात. पण दुर्दैवाने त्यांना त्यात यश मिळत नाही आणि पार्वती आपल्या सर्व शक्तींचा त्याग करून स्मृती रूपात तिच्या गतजन्मात जाते.कित्येक युगं मागे, तिच्या सती जन्मात. आणि सुरू होते दक्षकन्या सती आणि महादेवांची कथेमुळे मालिकेत रंजक वळण आले आहे.