Join us

निक्की तांबोलीने उडवली राहुव वैद्यची खिल्ली, नंतर म्हणाली बुरा ना मानो होली है !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 18:32 IST

Nikki Tamboli Trolled Rahul Vaidya:निक्की तांबोलीन सोशल मीडियावर राहुल वैद्यची खिल्ली उडवताना दिसली. पूर्णपण मजा घेतल्यानंतर बुरा ना मानो होली है म्हणत....राहुलची टर उडवतानाही दिसली.

टीव्ही शो बिग बॉसच्या घरात निकी तांबोली आणि राहुल वैद्य यांची मैत्री चांगलीच चर्चेत राहिली. एकेकाळी दोघांमध्ये चांगली मैत्री होती. मात्र शोमध्ये एंट्री झाल्यानंतर हे दोघेही एकमेकांचे वैरी बनलल्याचे समोर आले होते. सतत छोट्या छोट्या कारणांवरुन एकमेकांशी भांडायचे. शो संपल्यानंतरही आता ख-या आयुष्यात त्यांची मैत्री फुट पडल्याचेच चित्र पाहायला मिळत आहे.निक्की तांबोलीन सोशल मीडियावर राहुल वैद्यची खिल्ली उडवताना दिसली. पूर्णपण मजा घेतल्यानंतर बुरा ना मानो होली है म्हणत....राहुलची टर उडवतानाही दिसली. सलमानने राहुल वैद्यला सायकल भेट म्हणून दिली आहे. बिल्डींग परिसरात राहुल वैद्य सायकल चालवताना दिसला. मीडियाच्या फोटोग्राफर्सनेही त्याला आपापल्या कॅमे-यात कैद केले. हेच फोटो पाहून निक्कीनी टोमणे मारायला सुरुवात केली. स्वतःच्याच बिल्डींगमध्ये सायकलवरुन फेरफटका मारला जातोय, काश मलाही मीडियाने माझ्या घराबाहेर अशा प्रकारे टीपले असते. तसेही मीडिया माझ्या अवती भोवती फिरतच असते.बुरा ना मानो होली है म्हणत राहुलची खिल्ली उडवली आहे. शोमधले होणा-या कुरापती निक्की अजूनही विसरलेली नाहीय.

त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती राहुल वैद्यवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे यापूर्वीही पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे राहुल वैद्यची चांगली मैत्रीण असलेली निक्की घरात जान कुमार सानूबरोबर तिचे खटके उडायचे. मात्र आता ख-या आयुष्यात तिची जान कुमार सानूबरोबरच चांगली मैत्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरातच राहुल वैद्यने दिशाला प्रपोज केले होते. यानंतर फिनाले वीकमध्ये खुद्द दिशा ‘बिग बॉस 14’च्या घरात आली होती आणि तिने राहुलला लग्नाला होकार दिला होता. येत्या जून महिन्यात राहुल व दिशा लग्नबंधनात अडकणार, अशी तूर्तास चर्चा आहे. मात्र अद्याप लग्नाची तारीख ठरलेली नाही. लग्नात कुटुंबातील काही लोक व मोजके लोक सहभागी व्हावेत, अशी राहुलची इच्छा आहे. यानंतर फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांसाठी तो एक ग्रँड रिसेप्शन देणार आहे.