Nikki Tamboli And Chota Pudhari: अभिनेता सिद्धार्थ जाधवचा 'आता होऊ दे धिंगाणा ३' हा कार्यक्रम गेल्यावर्षी १६ नोव्हेंबरपासून सुरू झाला होता. याचे दोन भाग आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. स्टार प्रवाहवर नवीन कुकिंग शो 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajali Re Upcoming Marathi Serial) सुरू होणार आहे. त्यामुळे लवकरच आता 'आता होऊ दे धिंगाणा ३' हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या शोच्या महाअंतिम सोहळ्यात कुकिंग शो 'शिट्टी वाजली रे' चे कलाकार उपस्थिती लावणार आहेत. याचे काही प्रोमो व्हिडीओ प्रदर्शित झाले आहेत.
निक्की तांबोळी ही 'शिट्टी वाजली रे' कार्यक्रमात सहभागी होणार आहे. त्यामुळे ती शोच्या इतर स्पर्धकांसोबत 'आता होऊ दे धिंगाणा ३'चा महाअंतिम सोहळ्यात उपस्थिती लावणार आहे. एवढंच नाही तर समोर आलेल्या प्रोमोमध्ये 'आता होऊ दे धिंगाणा ३'चा महाअंतिम सोहळ्यात ती 'बिग बॉस मराठी' फेम छोटा पुढारीही सहभागी झाल्याचा दिसतोय.
निक्की तांबोळी आणि छोटा पुढारी हे 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात दिसले होते. दोघांमध्ये मैत्री पाहायला मिळाली होती. त्यांच्या संभाषणातील काही शब्द व्हायरल झाले होते. 'बिग बॉस'च्या बाहेर आल्यानंतर त्यांची एकदा भेटी झाली होती. पण, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे छोटा पुढारीच्या वाढदिवशी त्याच्या गावी जाण्याचं वचन निक्कीनं दिलं होतं. पण, तिनं ते पुर्ण न केल्यानं छोटा पुढारी तिच्यावर नाराज होता. आता ही जोडी काय कल्ला घालणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.