सध्या 'बिग बॉस मराठी ६'ची सर्वत्र चर्चा होते आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकत्र दिसले होते. बिग बॉसच्या घरात त्यांचे सूर जुळले होते. निक्की आणि अरबाजने बिग बॉस मराठीचं घर गाजवलं होतं. आता पुन्हा निक्की आणि अरबाज एकत्र रिएलिटी शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत. पण, ते बिग बॉस मराठीमध्ये एन्ट्री घेणार नसून एका नव्या रिएलिटी शोमध्ये दिसणार आहेत.
निक्की आणि अरबाज 'दी फिफ्टी (The 50)' या नव्या रिएलिटी शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत. The 50 हा शो लवकरच सुरू होणार असून याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता आहे. या शोमध्ये ५० सेलिब्रिटी एकत्र येणार आहेत. यापैकी निक्की आणि अरबाज हे दोन सेलिब्रिटी आहेत. निक्की आणि अरबाजने त्यांच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांना The 50 या शोचं आमंत्रण आल्याचं दिसत आहे. या दोघांनाही पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
निक्की आणि अरबाजसोबत अनेक सेलिब्रिटी The 50 मध्ये दिसणार आहेत. राकेश बापटची एक्स पत्नी रिद्धी डोग्रादेखील The 50 मध्ये एन्ट्री घेणार आहे. याशिवाय प्रेक्षकांचा लाडका शिव ठाकरेदेखील या रिएलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे. बिग बॉस १९ फेम नेहाल चुडासमा आणि नीलम गिरी The 50 शोमध्ये एन्ट्री घेणार आहेत. याबरोबरच फैजल शेख, रजत दलाल, करण पटेल, मोनालिसा, अर्चना गौतम, प्रिंस नरुला, युविका चौधरी, खानजादी, उर्वशी ढोलकिया या नावांचीदेखील चर्चा आहे. १ फेब्रुवारीपासून हा नवा रिएलिटी शो सुरू होणार आहे.
Web Summary : Nikki Tamboli and Arbaaz Patel, known from Bigg Boss Marathi, are entering 'The 50,' a new reality show featuring 50 celebrities. The show starts February 1st and also includes Ridhhi Dogra and Shiv Thakare.
Web Summary : बिग बॉस मराठी से मशहूर निक्की तंबोली और अरबाज पटेल 'द फिफ्टी' नामक नए रियलिटी शो में दिखेंगे, जिसमें 50 हस्तियां शामिल हैं। यह शो 1 फरवरी से शुरू होगा, जिसमें रिद्धि डोगरा और शिव ठाकरे भी हैं।