Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ती फक्त फूटेजसाठी सर्व करते...'; पत्रकारांसमोरच निक्कीचा जान्हवीवर गंभीर आरोप, उडाली वादाची ठिणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 18:29 IST

पत्रकारांसमोरच निक्की-जान्हवी एकमेकींशी भांडायला लागल्या. नवीन प्रोमोत हे स्पष्टपणे बघायला मिळतंय (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये आज भाऊचा धक्का रंगणार नाहीय. आठवड्याच्या विकेंडला दर शनिवारी-रविवारी रितेश देशमुख भाऊचा धक्का भरवतो. पण या शनिवारी - रविवारी रितेश देशमुख बिग बॉस मराठीमध्ये सहभाग होणार नाहीय. रितेशच्या जागी डॉ. निलेश साबळे या शनिवारी बिग बॉसच्या घरात सहभागी होणार आहे. याशिवाय आज शनिवारी मराठी मनोरंजन विश्वातील पत्राकर सहभागी होणार असून ते सदस्यांवर प्रश्नांच्या फैरी झाडणार आहेत.

पत्रकारांच्या प्रश्नावर जान्हवी-निक्कीचं भांडण

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोत पत्रकारांसमोर निक्की-जान्हवी भांडताना दिसणारल आहेत. पत्रकारांनी निक्कीला विचारले की,"तू जान्हवीच्या प्रश्नांची सडेतोड उत्तर देत नाहीस तू घाबरते का?" यावर जान्हवी म्हणाली,"हो निक्की मला घाबरते". यावर निक्की म्हणाली की,"जान्हवी जे पण काही करते फुटेजसाठी करत आली आहे." निक्की पुढे म्हणाली, "मी हिच्यासमोर संभाषण केलं तर ही दिसेल आणि हे मला मंजूर नाही. " त्यावर जान्हवी म्हणाली, "तुझ्याबरोबर दिसण्यापेक्षा मी बाहेर जाईन."

आज घरात रंगणार महाराष्ट्राचा धक्का

'बिग बॉस मराठी'चा हा महाराष्ट्राचा धक्का खूपच मसालेदार असणार आहे. पत्रकार अनेक प्रश्न सदस्यांना विचारताना दिसणार आहे. घरातील सदस्यांवर पत्रकारांच्या प्रश्नांचा घेराव पडणार आहे. बिग बॉस मराठीमध्ये रितेश देशमुखचा भाऊचा धक्का आज नाही तर उद्या रंगणार आहे. याशिवाय उद्या घरातील एक सदस्य बाहेर जाताना दिसणार आहे. आता कोण घराबाहेर जाणार हे प्रेक्षकांना उद्याच्या भागात कळून येईलच.

टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजन