Join us
Daily Top 2Weekly Top 5

निकी अनेजाला या गोष्टीमुळे बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 12:14 IST

अस्तित्व एक प्रेम कहानी या मालिकेमुळे निकी अनेजा हे नाव घराघरात पोहोचले. तिने या मालिकेत साकारलेली डॉ.सिमरनची भूमिका प्रचंड ...

अस्तित्व एक प्रेम कहानी या मालिकेमुळे निकी अनेजा हे नाव घराघरात पोहोचले. तिने या मालिकेत साकारलेली डॉ.सिमरनची भूमिका प्रचंड गाजली होती. या मालिकेनंतर ती गेल्या 11 वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. ती दरम्यानच्या काळात लंडनमध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत राहात होती. पण आता इश्क गुनाह या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 
इश्क गुनाह या मालिकेत संजय कपूर तिच्यासोबत झळकणार आहेत. संजय कपूरची देखील ही पहिलीच मालिका आहे. संजयने प्रेम, राजा, औजार यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. आता तो मालिकेत झळकणार आहे. ही मालिका अस्क-इ-मेम्नू या गाजलेल्या तुर्की मालिकेचे भारतीय रूपांतरण असून त्यात प्रेम आणि नातेसंबधांचे धाडसी चित्रण करण्यात आले आहे. या मालिकेसाठी निकी लंडन सोडून वर्षभर भारतात आली आहे. निकीने तिच्या आजवरच्या अभिनयातून ती खूप चांगली अभिनेत्री असल्याचे सिद्ध केले आहे. पण तरीही या मालिकेसाठी तिला ऑडिशन द्यावे लागले. याविषयी निकी सांगते, या मालिकेसाठी मी रितसर ऑडिशन दिले होते. मला कित्येक महिन्यांपासून अभिनयक्षेत्रात कमबॅक करायचे होते. त्यासाठी मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होती. त्याचवेळी माझ्या एका मित्राने मला इश्क गुनाह या मालिकेतील लैला या भूमिकेविषयी सांगितले. ही भूमिका ऐकून मी प्रचंड खूश झाले होते. पण या भूमिकेसाठी मला ऑडिशन द्यावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. हे ऐकल्यावर खरे तर मला धक्काच बसला होता. पण सध्या छोट्या पडद्यावर ऑडिशनशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे मी ऑडिशन द्यायला तयार झाले. पण ऑडिशन दिल्यावर काही महिने उलटून गेल्यावरही मला कोणाचाच फोन आला नाही. त्यामुळे मी आशा सोडून दिली होती. पण अचानक एकेदिवशी मालिकेच्या टीमकडून मला फोन आला आणि या भूमिकेसाठी मीच त्यांना योग्य वाटत असल्याचे त्यांनी मला सांगितले आणि या मालिकेचा माझा प्रवास सुरू झाला. Also Read : मी अभिनेत्री असल्याचे काही वर्षं तरी विसरले होतेः निकी अनेजा वालिया