Join us
Daily Top 2Weekly Top 5

करणवीर बोहराने पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत होळीच्या काही दिवस आधीच असे केले होळीचे सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 18:10 IST

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा, त्याची पत्नी तीजे सिधू आणि त्यांची जुळी मुले बेला व विएन्ना यांनी यंदाची होळी जरा अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचं ठरवलं आहे.

ठळक मुद्देया होळी पार्टीमध्ये टेलिव्हिजन आणि बॉलीवुडमधील दिग्‍गज व्‍यक्‍ती उपस्थित होते. राज कुंद्रा, इक्‍बाल खान, करण मेहरा, कश्‍मीरा शाह, रघू राम, जय भानुशाली, कांची कौल, सिद्धार्थ कन्‍नन, बरखा बिश्‍त आणि इंद्रनील सेनगुप्‍ता, राघव साचर यांनी आपापल्‍या मुलांसोबत य

होळीचा सण म्हणजे आनंद, आरोग्य आणि संस्मरणीय क्षणांना रंगांनी न्हाऊ घालणे! आता होळीचा आठवडा सुरू होत आहे. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता करणवीर बोहरा, त्याची पत्नी तीजे सिधू आणि त्यांची जुळी मुले बेला व विएन्ना यांनी यंदाची होळी जरा अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचं ठरवलं आहे. निकलोडियन किड्सच्या चॉईस अॅवॉर्डसच्या भारतीय पर्वामुळे स्लाइम आता प्रत्येक मुलाच्या हातात दिसते आणि प्रचंड लोकप्रियही झाले आहे.

निकलोडियनच्या स्लाइम-टॅस्टिक होळी पार्टीमध्ये या गोंडस जुळ्या भावंडांनी होळीचे प्रतिक म्हणून हिरव्या रंगाच्या स्लाइमने मित्रमंडळींसोबत धमाल केली. तारेतारकांचा समावेश असलेल्या या पार्टीमध्ये बरीच मजा होती. मुलांसाठी सुरक्षित होळी साजरी करत होळीची परंपराही जपली गेली आणि काही संस्मरणीय आठवणीही तयार केल्या.

या होळी पार्टीमध्ये टेलिव्हिजन आणि बॉलीवुडमधील दिग्‍गज व्‍यक्‍ती उपस्थित होते. राज कुंद्रा, इक्‍बाल खान, करण मेहरा, कश्‍मीरा शाह, रघू राम, जय भानुशाली, कांची कौल, सिद्धार्थ कन्‍नन, बरखा बिश्‍त आणि इंद्रनील सेनगुप्‍ता, राघव साचर यांनी आपापल्‍या मुलांसोबत यावेळी होळी खेळली.

या प्रेमळ बोहरा भावंडांनी चविष्ट मेन्युही ठेवला होता. कप केक्स, स्लाइमची थीम असलेले आइस्क्रीम, कँडी फ्लॉस, पिझ्झा, होळी स्पेशल थंडाई आणि असे अनेक रुचकर पदार्थ या पार्टीमध्ये होते. ग्रीन स्लाइम मॅनिया, स्लाइमचे अनेक मजेशीर खेळ, तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थ, अनेक मॉकटेल्स आणि थिरकायला लावणारं संगीत यामुळे मुलांसोबतच पालकांचाही वेळ मजेत गेला. निकलोडियनने स्लाइम फोम पाथवे, स्लाइम इनफ्लॅटेबल स्लाइड, स्पिन द व्हील आणि अशा अनेक आकर्षक खेळ व उपक्रमांतून मुलांना आनंद दिला.

 

स्लाइम-टॅस्टिक पार्टीचे होस्‍ट करणवीर बोहरा आणि टीजे सिधू या पार्टीविषयी सांगतात, "आम्‍ही होळीमध्‍ये नेहमी नॉन-टॉक्सिक रंगांचा वापर करतो, पण यावेळी इको-फ्रेंडली होळी साजरी करण्‍याकरिता आम्‍ही निकलोडियन सोबत काम करत आहोत. स्‍लाइम आणि फोम सोबत ही एक मजेशीर होळी होती, ज्‍यामध्‍ये आम्‍हाला पाणी फुकट न घालवण्‍याबाबत देखील शिकवण मिळाली. बेला व विएन्नाची ही पहिली होळी पर्यावरणास अनुकूल आहेच, शिवाय त्‍यांचे आवडते निकटून्‍स मोटू व पतलू यांच्‍यासह ती अत्‍यंत मजेशीर देखील ठरली आहे."

 

टॅग्स :करणवीर बोहरा