Join us

"गुलमोहोर" या कथामालिकेतील पुढील कथा आहे "लंच ब्रेक"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 14:06 IST

एक छोटीशी कथा... त्यात दाखवले जाणारे अगदी साधे साधे प्रसंग, प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातले.प्रत्येक घटनेतून परस्परांच्या नात्यांची विण अलगद उसवत ...

एक छोटीशी कथा... त्यात दाखवले जाणारे अगदी साधे साधे प्रसंग, प्रत्येकाच्या रोजच्या जीवनातले.प्रत्येक घटनेतून परस्परांच्या नात्यांची विण अलगद उसवत एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करणारी झी युवा वाहिनीवरील "गुलमोहोर" हि कथामालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे. या कथामालिकेमधून "थोडक्यात महत्वाचे" मिळत असल्याने यातील कलाकार व प्रेक्षक या दोघांसाठीही हा एक वेगळा अनुभव आहे. या कथामालिकेतील पुढील कथा आहे "लंच ब्रेक" हि कथा आहे एका श्रीमंत बापाची गर्विष्ठ मुलगी अदिती आणि एका कार गॅरेजचा मालक पप्पू जो आपल्या तत्वांसोबत एकनिष्ठ आहे... फास्ट कार ड्राइव्ह करायला आदितीला खूप आवडतं. अशाच एका दुपारी तिच्या कारचा छोटासा अपघात होऊन गाडीला स्क्रॅच जातो. कार लगेच रिपेअर करण्यासाठी म्हणून आदिती पप्पूच्या गॅरेजमध्ये जाते.पप्पू आणि मंडळींचा नेमका लंच ब्रेक असल्याने पप्पू तिला थोडावेळ थांबायला सांगतो.आदितीला वाट पाहणं जमत नसल्याने दोघांमध्ये एका मोठ्या भांडणाचा भडका उडतो.हे भांडण नेमकं कोणत्या थराला जाईल? अदितीचा एटीट्युड पप्पू बदलू शकेल का? एका छोट्याशा कार गॅरेजचा मालक असलेल्या पप्पूच्या प्रेमात आदिती खरंच पडेल का? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील झी युवावरील गुलमोहोरच्या येत्या सोमवार आणि मंगळवारी रात्री ९:३० वा प्रसारित होणाऱ्या "लंच ब्रेक" या नव्या कथेमध्ये.सखी गोखले (आदिती) व शिवराज वायचळ (पप्पू) यांनी त्यांच्या सहजसोप्या अभिनयाने यात मजा आणली आहे.शिवराजने यावेळी बोलताना सांगितलं की, "गुलमोहोर या मालिकेचा पॅटर्न खूपच वेगळा आहे. यामध्ये सादर होत असलेल्या कथांचा विषय अतिशय मार्मिक आणि सर्वसामान्यांच्या जवळचा असल्याने यात काम करताना मजा आली.सखी बरोबर काम करण्याचा हा पहिलाच अनुभव असून आम्ही खूप मजा केली. याआधी झी युवावरीलच बन मस्का या मालिकेमधील भूमिका प्रसिद्ध झाल्यामुळे झी युवावर पुन्हा नवीन भूमिका करायला जास्त हुरूप आल्याचे शिवराजने सांगितलं.