Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुढचे पाऊल या मालिकेत सायली प्रधानचे होणार आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 09:41 IST

पुढचं पाऊल ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड ...

पुढचं पाऊल ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अक्कासाहेब ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. ही भूमिका हर्षदा खानविलकर ताकदीने पेलत आहेत. तसेच या मालिकेने जुई गडकरीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.आता या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री पाहायला मिळणार आहे. सरदेशमुख कुटुंबात एक नवी सून येणार आहे.मालिकेच्या पुढील भागात कथानकाला अनेक वळणे मिळणार आहेत. ऑस्ट्रेलियातील रोहितच्या म्हणजेच अभिजीत केळकरच्या कंपनीत स्ट्राईक होतो आणि त्यात त्याला अनेक कोटींचं नुकसान होतं. हे सगळे तो मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतानाच रूपाली आणि तिची आई त्यात आणखी घोळ घालतात. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होतं. या सगळ्यानंतर रूपाली आणि रोहितमध्ये घटस्फोट होतो. अशावेळी एक मुलगी रोहितच्या मदतीला धावून येते आणि या सगळ्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढते. या मुलीचे नाव सायली प्रधान असून ती ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या कंपनीची सीइओ आहे. सायलीने रोहितला त्याच्या या संकटात मदत केल्यामुळे त्यांची घट्ट मैत्री होते आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि पर्यायी लग्नात होतं. सायलीची भूमिका अभिनेत्री तेजश्री धरणे साकारत आहे.केवळ रोहितलाच नाही तर रोहितची मुलगी छकुलीलादेखील ती सांभाळून घेणार आहे आणि त्यामुळे छकुली आणि तिच्यात एक वेगळं नातं निर्माण होतं. पण छकुलीच्या संगोपनात कोणीही हस्तक्षेप केलेला तिला आवडत नाही. तसेच सायली अतिशय महत्त्वकांक्षी, स्पष्टवक्ती आणि आपल्या मतांवर ठाम राहाणारी आहे. त्यामुळे सरदेशमुखांच्या या मॉडर्न सुनेत आणि अक्कासाहेब यांच्यात खटके उडणार का हे पाहाणे मनोरंजक ठरणार आहे.