Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘दिया और बाती हम’च्या प्रेक्षकांना सुखावणारी न्यूज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2016 13:07 IST

छोट्या पडद्यावरील दिया और बाती हम या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे.. ही मालिका 15 ऑगस्टला निरोप घेणार ...

छोट्या पडद्यावरील दिया और बाती हम या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आहे.. ही मालिका 15 ऑगस्टला निरोप घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता तसं काहीही होणार नसून मालिका सुरुच राहणार आहे.. मालिका सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार असल्याचं आता समोर आलंय. त्यातच या मालिकेतील कथानकात काही नव्या गोष्टी पाहायला मिळतायत. या ट्विस्ट एंड टर्नमुळं मालिकेचा टीआरपी वाढला तर मालिका सप्टेंबरनंतरही सुरु राहू शकते अशी माहिती मिळतेय. घसरत्या रेटिंग्समुळं ही मालिका संपवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.त्यात मालिकेतील मुख्य भूमिका निभावणारे कलाकार दीपिका सिंग (संध्या) आणि अनस रशीद (सूरज) यांच्या नख-यांनाही निर्माते कंटाळले होते. मात्र आता मालिका निर्मात्यांनी या मालिकेला रेटिंग्समध्ये सुधारणा आणण्याची आणखी एक संधी दिलीय...