Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये हसीन वादियां ये, शाहीर शेख पत्नीसह करतोय भूटानची सफर, निवांत क्षण करतोय एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 13:03 IST

शाहीर शेखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून पत्नीसोबत तो निवांत क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतोय.

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' फेम शाहीर शेख सध्या पत्नी रुचिका कपूरसह हनीमून एन्जॉय करत आहे. शाहीरने गुपचूप त्याचे लग्न उरकले. लग्नाचा गाजावाजा न करता त्याने कोर्ट मॅरेज करत त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली.हनीमूनसाठी दोघांनी भुटानची निवड केली. निसर्गाच्या सानिध्यात दोघेही एकमेकांसह क्वॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत.

 

शाहीर शेखला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून पत्नीसोबत तो निवांत क्षण एन्जॉय करताना पाहायला मिळतोय.

शाहिर आणि रुचिका दोघेही पूर्वीपासून एकमेकांना ओळखतात.दोघांचे एकत्र वेळ घालवणे, एकत्र फिरणे यामुळे दोघांमध्ये अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्यावर स्पष्टीकरण दिले नव्हते. अखेर शाहीरनेच पुढाकार घेत दोघेही नात्यात असल्याचे सांगत प्रेमाची जाहीर कबूली दिली होती. शाहीरने सांगितले होते की, आम्ही लग्नबंधनात अडकले असलो करी पती- पत्नी नंतर याआधी आम्ही दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहोत.

शाहीर हा भारताप्रमाणेच अनेक इंडोनियामधील मालिकेत देखील काम करतो. इंडोनेशिया मध्ये देखील त्याला चांगलीच लोकप्रियता आहे. त्याने अयू टींग टींग सोबत इंडोनेशियामधील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

शाहीरला अभिनयाव्यतिरिक्त लेखन करण्यातही रस आहे. याविषयी त्याने सांगितले होते की, लेखन हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून वयाच्या 15-16 व्या वर्षापासून मी लेखन करत आहे. पण माझा बहुतांशी सारा वेळ अभिनय करण्यात आणि या व्यक्तिरेखेला साकार करण्यात जात असल्याने मला कविता करण्याकडे लक्ष देण्यासही वेळ मिळत नाही. 

 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' शाहीरसह एरिका फर्नांडिस झळकली होती. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांच्या तुफान पसंतीस पात्र ठरली. मालिकेत त्यांच्या रोमँटीक ट्रॅकमुळे दोघेही रिअल लाईफमध्येही कपल असल्याचे चाहत्यांना वाटायचे. एकत्र दिसले की,दोघांवर तर्क- वितर्क लावले जायचे. अखेर दोघांमध्ये फक्त मैत्री आहे हे स्पष्ट झाले.