Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉसच्या घरातील नवा व्हिलन...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 19:42 IST

काल-परवापर्यंत बिग बॉसच्या घरातील व्हिलन म्हणून ओळखले जाणारे स्वयंघोषित बाबा स्वामी ओमची जागा आता घरातील दुसºयाच सदस्याने घेतली आहे. ...

काल-परवापर्यंत बिग बॉसच्या घरातील व्हिलन म्हणून ओळखले जाणारे स्वयंघोषित बाबा स्वामी ओमची जागा आता घरातील दुसºयाच सदस्याने घेतली आहे. हा सदस्य दुसरा-तिसरा कोणीही नसून, प्रियंका जग्गा आहे. नॉमिनेट झाल्यानंतर तिने घरातील वातावरण अशा पद्धतीने कलुषित केले की, स्वामी ओमची बोलती बंद झाली आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट होऊन घराबाहेर पडलेल्या प्रियंकाने वाइल्ड कार्डद्वारे घरात पुन्हा एंट्री केली आहे. खरं तर प्रियंकाने सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यात घरातील सर्वच सदस्यांना सळो की पळो करून सोडले होते. घरातील असा एकही सदस्य नसावा ज्याच्याशी तिने त्यावेळेस पंगा घेतला नसेल. तिचा हा स्वभाव कदाचित लोकांना पसंत आला नसल्याने तिला घराबाहेरचा रस्ता दाखविला होता. परंतु पुन्हा ती घरात परतल्याने स्वामी ओम यांना वगळता सर्वच सदस्यांच्या अंगावर शहारे उभे राहिले होते; मात्र गेल्या आठवड्यात तिने संयमी भूमिका घेतल्याने घरातील सर्वच सदस्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण होते. परंतु जेव्हा घरातील बहुतेक सदस्यांनी तिला नॉमिनेट केल्याने आता तिने पुन्हा पहिल्यासारखाच रौद्रावतार धारण केला आहे. याचा प्रत्यय सर्वात अगोदर बानीला आला असून, तू मला का नॉमिनेट केले यावरून तिला धारेवर धरले. त्यातच बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी एक आगळावेगळा टास्क दिल्याने तिने घरातील सर्वच सदस्यांशी पंगा घेतला आहे. या टास्कमध्ये ती वाहतूक पोलिसाच्या भूमिकेत आहे. लोपामुद्रा राऊत आणि तिच्यात चांगलीच खडाजंगी झाली असून, दोघींनीही एकमेकींचे उणेदुणे काढले आहेत. वाइल्ड कार्ड एंट्री केलेल्या जेसनसोबतदेखील तिने पंगा घेतला आहे. राहुल देव याने तर मला प्रियंकाची अजूनही भीती वाटत असल्याचे सांगितल्याने तिला जणू काही बळच मिळाले आहे. अर्थात यासर्व प्रकारामध्ये स्वामी ओम काहीसे पडद्याआड गेले असल्याने ते प्रियंकाला कशा प्रकारे ओव्हरटेक करीत हे बघणे मजेशीर असेल. कारण स्वामी ओम यांनी प्रियंकाला मुलीचा दर्जा दिल्याने त्यांच्यातील हे नाते किती काळ टिकणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.