Join us
Daily Top 2Weekly Top 5

'येऊ कशी तशी मी नांदायला'मध्ये नवीन ट्विस्ट, ओम करणार स्वीटूला प्रपोज, काय असेल तिचं उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 17:14 IST

या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला'  मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली . प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे, ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटूला प्रपोज करणार आहे.

स्वीटू ला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत, काय असेल स्वीटू चं उत्तर?  आता ह्या दोघांमध्ये असलेली श्रीमंती आणि गरिबीची दरी या नात्यात अडथळा ठरेल? काय असेल मालविक, मोहित आणि मोमो ची प्रतिक्रिया? शकू(आई) आणि रॉकी च्या मदतीने ओम नलू मावशी आणि साळवी कुटुंबा कडून दोघांमध्ये बहरणाऱ्या या नवीन नात्याला होकार मिळवू शकेल? ह्या सर्व प्रश्नांची उत्तर लवकरच आपल्याला मिळतील. 

टॅग्स :झी मराठी