Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा' मालिकेत येणार नवा ट्विस्ट; सौंदर्या समोर येणार हे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 16:39 IST

दीपिका-कार्तिकीच्या पिकनिकच्या निमित्ताने दीपा आणि कार्तिकही एकत्र आले होते. त्यानंतर आता आणखी एक ट्विस्ट रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिकेत पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) ने फार कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेचं कथानक आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. या मालिकेत आता नवीन ट्विस्ट आला आहे. दीपिका-कार्तिकीच्या पिकनिकच्या निमित्ताने दीपा आणि कार्तिकही एकत्र आले. त्यानंतर आता आणखी एक ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्रामवरील अधिकृत अकाउंटवर रंग माझा वेगळा मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून लिहिले की, दीपाच कार्तिकीची आई', सौंदर्या समोर येणार सत्य...'रंग माझा वेगळा' शनिवार ८ जानेवारी रा. ८:०० वा. Star प्रवाहवर.

या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, दीपिका तिच्या आजीला म्हणजेच सौंदर्याला कार्तिकीच्या घरी घेऊन येते. तेव्हा सौंदर्याच्या लक्षात येतं की हे दीपाचं घर आहे. तेव्हा सौंदर्याला प्रश्न पडतो की, कार्तिकीची आई दीपाची तर नसेल ना. तेव्हा दीपिका कार्तिकीला सांगते की माझ्या आजीला तुझ्या आईला भेटायचे होते. सौंदर्या कार्तिकीला विचारते तुझी आई दिसते कशी गं. त्यावर कार्तिकी लगेच दीपाचा फोटो सौंदर्याला देते. तेव्हा दीपा तुझी आई आहे म्हणत सौंदर्या कार्तिकीला मिठी मारते. सौंदर्याला कार्तिकी दीपाची मुलगी असल्याचे सत्य समजते आणि ती कुठे राहते हेदेखील कळते. त्यानंतर आता सौंदर्या काय पाऊल उचलणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह