Join us

अग्गंबाई सूनबाईमध्ये येणार ट्विस्ट, शुभ्रासमोर होणार सुझेन आणि सोहमच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 16:28 IST

आता शुभ्राला आणखी एक धक्का बसणार आहे.

झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. ह्या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या  जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड.

आता शुभ्रा ला आणखी एक धक्का बसणार आहे, कारण सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण तिच्या समोर येणार आहे. शुभ्रा हा धक्का पचवू शकेल? आसावरी आणि अभिजित सुनेच्या बाजूने उभे राहणार आहेत हे नक्की. मनाने खचलेल्या शुभ्रा च्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती कोण असेल?

 

टॅग्स :झी मराठी