Join us

'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, मालिकेत होणार अनिरुद्धची सूलु मावशी राजा भाऊंची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:56 IST

Aai kuthe kay karte : कांचन आजीची बहीण सुलू आणि राजा भाऊंच्या एंट्रीमुळे मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

आई कुठे काय करते या मालिकेने उत्तम कथानक आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका टीआरपी आणि लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. अरुंधतीला नात्यातून मोकळं केल्यानंतरही अनिरुद्ध तिची पाठ सोडायला तयार नाही. तो सातत्याने तिच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेत अनिरुद्धची मावशी आणि काकांची एंट्री होणार आहे. नवीन पात्रांच्या एंट्रीमुळे मालिका कोणतं नवं वळण घेणार हे पाहवं लागले.

सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत कांचन आजीची बहिण सुलू मावशी आणि राजा भाऊंची एंट्री होणार आहे. कांचन आजी आपल्यासोबत बहीण सुलू आणि राजा भाऊंना घेऊन घरी येतात.

 

आप्पा कांचन आजीला पाहून तू आलीस असा प्रश्न विचारतात. कांचन आजी एकदिवस आधी आले कारण तुमची आठवण येत होती मला नाही तर राजा भाऊंना असे सांगतात. अविनाश आणि अनघा मावशी आणि काकांचं स्वागत करतात. आप्पा राजा भाऊंना पाहून कोपऱ्यापासून नमस्कार करतात. राजा भाऊंना ऐकायला कमी येते. आता कांचन आणि सुलू मावशी मिळून संजनाला सरळ करणार का?, हे पाहवं लागलं. सूलु मावशी आणि आप्पांच्या एंट्रीमुळे मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार हे लवकरत कळेल. 

 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका