Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट; पुन्हा जवळ येतील का दीपा-कार्तिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:34 IST

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla)ने अल्पावधीतच रसिकांच्या मनात घर केले. दरम्यान आता मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत आता दीपा आणि कार्तिक कित्येक वर्षानंतर समोर आले आहेत. एकीकडे कार्तिक आणि दीपाचा घटस्फोट होणार आहे तर दुसरीकडे कार्तिक आणि आयशाचा साखरपुडा होणार आहेत. मात्र रंग माझा वेगळा मालिकेच्या नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांना आता पुन्हा दीपा आणि कार्तिक पिकनिकच्या निमित्ताने जवळ येतील का असा प्रश्न पडला आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर रंग माझा वेगळा मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो शेअर करून लिहिले की, या पिकनिकच्या निमित्ताने पुन्हा जवळ येतील का दीपा-कार्तिक... 'रंग माझा वेगळा'. गुरुवार २३ डिसेंबर रा. ८:०० वा. स्टार प्रवाहवर.

या प्रोमोत पाहायला मिळत आहे की, कार्तिक दीपिकाला आता तू पिकनिकला जायचं असं का म्हणते आहेस. त्यावर दीपिका म्हणते की, कार्तिकीला सांगितले होते की गेलो तर एकत्र पिकनिकला जायचे. इतक्यात कार्तिकी धावत येते आणि दीपिकाला मिठी मारते. त्यावेळी कार्तिक तिला विचारतो की तुझ्या बरोबर कोण आले आहे?, त्यावर कार्तिकी हात दाखवत सांगते ती बघा माझी आई. जेव्हा कार्तिक दीपाला पाहतो तेव्हा त्याला धक्का बसतो. मात्र त्यानंतर दीपा आणि कार्तिक एकाच गाडीतून मुलींसोबत जाताना दिसतात. हा प्रोमो पाहून प्रेक्षक दीपा आणि कार्तिक पुन्हा एकत्र येतील का, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. हा उत्कंठावर्धक भाग २३ डिसेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह