Join us

दीपा कार्तिकचा होणार घटस्फोट? रंग माझा वेगळा मालिकेत येणार नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 19:00 IST

‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला.

छोट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' ही मालिका.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहेत. छोट्या पडद्यावरील या मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. आगळी वेगळी कथा आणि हटके मांडणी यामुळे ही मालिका सध्या बरीच चर्चेत आहे.आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. 

‘रंग माझा वेग’ळा मालिकेत सध्या दीपाचा कसोटीचा काळ सुरु आहे. दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत कार्तिकने पितृत्व नाकारलं. स्वाभिमानी दीपाने इनामदारांचं घर सोडत एकटं रहाण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीसमोर हतबल न होता ती दररोज नवनवी आव्हानं स्वीकारते आहे. या कठीण काळात सौंदर्या मात्र तिच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे. सासुबाईँच्या आशिर्वादानेच पुढचा प्रवास करण्याचं दीपाने ठरवलं आहे.

सासुबाईंची खंबीर साथ असली तरी कार्तिकचा गैरसमज इतक्या टोकाला गेला आहे की त्याने आता दीपाला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दीपावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्याच दीपापासून विभक्त होण्याचं त्याने ठरवलं आहे. श्वेताच्या षडयंत्राला बळी पडत दीपापासून दूर जाण्याची वेळ कार्तिकवर आली आहे. या सगळ्यात सौंदर्याची प्रतिक्रिया काय असेल? कार्तिकला दीपाच्या खऱ्या प्रेमाची किंमत कळणार का? दीपा या प्रसंगाचा सामना कसा करणार?  हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.या कथेत आता पुढे नेमकं काय घडणार?, याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना लागून राहिली आहे.