मराठी टेलिव्हिजनवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून टीआरपीमध्ये रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) मालिका पहिल्या स्थानावर आहे. या मालिकेतील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसते आहे. नुकताच या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अखेर दीपा आणि कार्तिक एकत्र येणार असून त्यांचे चौकोनी कुटुंब पूर्ण होणार आहे.
रंग माझा वेगळा मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. यात शाळेच्या शिक्षिका सांगतात की, शाळेत नाटक सादर करणार आहोत आणि यात मोठांच्या भूमिकादेखील आहेत. त्या भूमिका मुलींच्या पालकांनी कराव्यात अशी शाळेची इच्छा आहे. त्यावर दीपिका म्हणाली डॅडा हो म्हण ना. त्यानंतर दीपा म्हणते मॅडम मला सुद्धा...पण लगेच कार्तिकी बोलते आई तू नाही म्हणू नको. त्यावर दीपा आडेवेडे घेते. पण दीपिका म्हणते की, तुम्ही जर काम केले नाही तर आम्हीदेखील काम करणार नाही. त्यामुळे शाळेच्या नाटकामध्ये कार्तिक दीपा कार्तिकी आणि दीपिकाच्या आई वडिलांची भूमिका साकारताना दिसतील. नाटकाच्या निमित्ताने हे चौकोनी कुटुंब एकत्र येणार आहे.