Join us

'आई कुठे काय करते' मालिकेत येणार नवं वळण; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 14:51 IST

अभिषेकवर जीवघेणा हल्ला होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीसमोर आणखी एक संकट उभं ठाकणार आहे. एकीकडे इशाला मानसिक धक्यातून सावरण्यासाठी मदत करत असतानाच दुसरीकडे अभिषेकवर जीवघेणा हल्ला होणार आहे.

डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या कामालाच पहिलं प्राधान्य दिलं. आता मात्र एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नी आणि मुलाचा खुन केल्याचा आरोप अभिषेकवर टाकला आहे. इतकंच नाही तर अभिषेकला बेदम मारहाण देखिल केली आहे.

अभिषेकवरचा हा आरोप खरा आहे का?  त्याची या आरोपातून कशी सुटका होणार? मुलांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणारी अरुंधती अभिषेकला यातून कसं सावरणार? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :स्टार प्रवाह