Join us
Daily Top 2Weekly Top 5

“सूर नवा ध्यास नवा छोटे शूरवीर”मध्ये या आठवड्यात घडणार 'ही' रंजक गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 08:05 IST

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत.

ठळक मुद्देहजेरी लावलेल्या पाहुण्यांनी छोट्या सुरवीरांना प्रोत्साहन दिलेचैतन्य, स्वराली आणि मीरा यांना वन्समोर मिळाले

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर' या कार्यक्रमातील छोटे सुरवीर आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. कार्यक्रमामधील सगळ्याच लहान मुलांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या सुंदर गाण्याने वेड लावले आहे. कार्यक्रमामधील हे छोटे सुरवीर विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत आहेत. कार्यक्रमामधील स्पर्धकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. येत्या सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या भागामध्ये देखील असेच काहीसे घडले. या आठवड्यामध्ये कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे, घाडगे & सून आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमधील कलाकारांनी म्हणजेच सुकन्या कुलकर्णी मोने, अतिशां नाईक, मृणाल दुसानीस, शशांक केतकर, शर्मिष्ठा राउत, समर्थ पाटील, अंकिता जोशी पनवेलकर, मयूर खांडगे, अद्वैत कुलकर्णी यांनी मंचावर हजेरी लावली आणि बरीच धम्माल मस्ती केली... 

 मंचावर कलर्स मराठी परिवारातील सदस्यांनी हजेरी लावली आणि छोट्या सुरवीरांना प्रोत्साहन दिले. दर आठवड्याप्रमाणे सगळ्याच मुलांनी अप्रतिम गाणी सादर केली. चैतन्य, स्वराली आणि मीरा यांना वन्समोर मिळाले. इतकेच नसून मृणाल आणि शशांकने भिजून गेला वारा या सुंदर गाण्यावर डान्स सादर केला. मृणालने खेळ मांडला आणि शशांकने मुझसे नाराज होतो ही गाणी सादर केली आणि कॅप्टनसनी दोघांना जीनियस दिले. शर्मिष्ठा, सुकन्या कुलकर्णी मोने, मृणाल, अंकिता यांनी एक धम्माकेदार डान्स सादर केला.

टॅग्स :सूर नवा ध्यास नवाशशांक केतकर