Join us
Daily Top 2Weekly Top 5

फुलपाखरू मालिकेत मानस आणि वैदेहीवर होणार आणखी एक नवीन गाणे चित्रित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 07:15 IST

मानस-वैदेहीचं प्रेम जसं प्रेक्षकवर्गाला आकर्षित करतं त्याचप्रमाणे या मालिकेचे आणखी एक आकर्षण आहे, ते म्हणजे या मालिकेतील गाणी! 

ठळक मुद्देमंगेश बोरगावकर याने गायलेलं हे गाणं विशाल राणे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आहे. हे या मालिकेतील अठरावं गाणं आहे. एखाद्या टीव्ही मालिकेत इतकी गाणी असणं हा एक विक्रमच आहे, असं निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आवर्जून सांगितलं.

'झी युवा' ही मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका घेऊन येते. मानस आणि वैदेहीची प्रेमकहाणी असलेली 'फुलपाखरू' ही मालिका त्यांच्यापैकीच एक आहे. या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. मानस-वैदेहीचं प्रेम जसं प्रेक्षकवर्गाला आकर्षित करतं त्याचप्रमाणे या मालिकेचे आणखी एक आकर्षण आहे, ते म्हणजे या मालिकेतील गाणी! 

रोमँटिक तसेच मैत्रीवर आधारित गाणी या मालिकेतून अनेकदा पाहायला मिळाली आहेत. यशोमन आपटे आणि हृता दुर्गुलेवर चित्रित झालेलं आणखी एक नवीन गाणं 'फुलपाखरू' मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे. मंगेश बोरगावकर याने गायलेलं हे गाणं विशाल राणे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आहे. हे या मालिकेतील अठरावं गाणं आहे. एखाद्या टीव्ही मालिकेत इतकी गाणी असणं हा एक विक्रमच आहे, असं निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी आवर्जून सांगितलं.

आता पुन्हा एकदा मानस आणि वैदेही यांचं एक रोमँटिक गाणं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. नेहमीप्रमाणेच या गाण्यातून सुद्धा साध्या, सोप्या शब्दांमध्ये निखळ प्रेमभावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. सुंदर शब्द आणि तितकंच अप्रतिम संगीत यामुळे हे गाणं खूपच छान झालं आहे. गायक मंगेश बोरगावकरने ते उत्तम गायलं आहे. या गाण्यावर चित्रित झालेला मानस आणि वैदेहीचा रोमान्स पाहायला प्रेक्षकांना नक्की आवडेल. अशीच अनेक वेगवेगळी गाणी 'झी युवा'वरील 'फुलपाखरू' या मालिकेतून प्रेक्षकांना यापुढेही पाहायला मिळतील असे या चित्रपटाच्या टीममधील मंडळींनी सांगितले. या नव्या गाण्याविषयी बोलताना सर्वांची लाडकी वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे सांगते, "फुलपाखरू या मालिकेत आम्ही आणखी एक नवीन गाणं घेऊन येतोय. हे मालिकेतलं अठरावं गाणं आहे. मंगेश बोरगावकर यांनी हे फारच छान गायलं आहे. गाण्यासाठी शूट करत असताना खूप मजा आली. हे गाणं कसं झालंय हे पाहण्याची मला सुद्धा फार उत्सुकता आहे. सगळ्यांनाच हे नवीन गाणं सुद्धा नक्की आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे. 

'फुलपाखरू' ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार संध्याकाळी ८.३० वाजता 'झी युवा'वर पाहायला मिळते.

टॅग्स :फुलपाखरूझी मराठी