Join us

बरखा झळकणार नव्या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 18:06 IST

हनुमान, परवरीश, तुम साथ हो जब अपने यांसारख्या मालिकेत झळकेली अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता एका नव्या मालिकेत झळकणार असल्याची ...

हनुमान, परवरीश, तुम साथ हो जब अपने यांसारख्या मालिकेत झळकेली अभिनेत्री बरखा बिष्ट सेनगुप्ता एका नव्या मालिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. महेश भट्ट यांच्या आयुष्यावर एक मालिका बनवली जात आहे. या मालिकेत अभिनेता विराफ पटेल महेश भट्ट यांच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्याासाठी एखाद्या चांगल्या अभिनेत्रीचा शोध प्रोडक्शन हाऊस घेत होते. बरखाने आतापर्य़ंत अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिने राम लीला या चित्रपटात साकारलेली भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. बरखा ही एक सशक्त अभिनेत्री असल्याने या मालिकेसाठी तिचा विचार केला जात असल्याचे म्हटले जात आहे. बरखा काहीच दिवसांत या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.