चिडिया घरमध्ये नवा सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 12:15 IST
चिडिया घर या मालिकेतील सदस्यांचे एकमेकांमध्ये असलेले प्रेम हे इतरांनी शिकण्यासारखे आहे. या मालिकेत कधीही आपल्याला भांडणं पाहायला मिळत ...
चिडिया घरमध्ये नवा सदस्य
चिडिया घर या मालिकेतील सदस्यांचे एकमेकांमध्ये असलेले प्रेम हे इतरांनी शिकण्यासारखे आहे. या मालिकेत कधीही आपल्याला भांडणं पाहायला मिळत नाही. पण आता मयुरी आणि कोयल यांच्यात चांगलेच वाद होणार आहेत. मालिकेत कुनिका सदानंदची लवकरच एंट्री होणार आहे. या मालिकेत ती मावशीची भूमिका साकारणार आहे. ती मयुरी आणि कोयल यांच्यात चांगलीच भांडणे लावणार आहे. या मालिकेतील माझी भूमिका मला खूपच आवडल्यामुळे ही मालिका मी स्वीकारली असे कुनिका सांगते. तसेच या मालिकेतील माझी भूमिका ही छोटी असली तरी खूपच रंजक आहे. भविष्यातही अशा भूमिका साकारायला मला नक्कीच आवडतील असेही ती सांगते.