Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'योग योगेश्वर जय शंकर'! लवकरच उलगडणार शंकर महाराजांचा जीवनप्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 20:00 IST

Yog yogeshwar Jai Shankar: प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य यातून उलगडलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या काही काळापासून छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात अनेक मालिकांच्या माध्यमातून ऐतिहासिक आणि पौराणिक कथांचा उलगडा होत आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवर आधारित मालिकांच्या निर्मितीत भर पडल्याचं दिसून येत आहे. सध्या कलर्स मराठीवर 'जय जय स्वामी समर्थ' ही पौराणिक मालिका सुरु आहे. विशेष म्हणजे याच पौराणिक मालिकांच्या यादीत आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'योग योगेश्वर शंकर महाराज' यांचा जीवनप्रवास उलगडला जाणार आहे. कलर्स मराठीने नुकताच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.

दरम्यान, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमधून शंकर महाराज यांची महती, त्यांचं जीवन आणि त्यांनी भक्तांसाठी केलेलं कार्य यातून उलगडलं जाणार असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या केवळ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मात्र, या मालिकेविषयी अनेक गोष्टी गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसिनेमा