Join us

‘कृष्णदासी’मध्ये लवकरच नवी एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 12:08 IST

'कृष्णदासी' या छोट्या पडद्यावरील मालिकेत लवकरच नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेत नवी एंट्री होणार आहे. या ...

'कृष्णदासी' या छोट्या पडद्यावरील मालिकेत लवकरच नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण या मालिकेत नवी एंट्री होणार आहे. या मालिकेतील आराध्या (सना अमिन शेख) हिच्या जीवनात एका तरुणाची एंट्री होणार आहे. या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ शिवपुरी साकारणार आहे. याआधी नागिन मालिकेत झळकलेल्या सिद्धार्थच्या एंट्रीमुळं कृष्णदासी मालिका आणखी रंजक बनणार आहे. उदय नावाचा हा तरुण आराध्याचा कॉलेजचा मित्र असतो. ब-याच वर्षांनंतर त्याची आराध्याच्या जीवनात एंट्री होणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण होऊ लागतं अशारितीने या मालिकेचं कथानक पुढे जाणार आहे. आता दोघांचं प्रेम टिकणार का याची उत्तरं लवकरच कृष्णदासी मालिकेत मिळतील.