एकरूप एका नव्या अवतारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2016 12:14 IST
सुहानी सी एक लडकी या मालिकेतील एकरूप बेदीच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. सध्या ती कुछ रंग प्यार ...
एकरूप एका नव्या अवतारात
सुहानी सी एक लडकी या मालिकेतील एकरूप बेदीच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते. सध्या ती कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत झळकत आहे. आता विषकन्या - एक अनोखी प्रेमकहानी या मालिकेत तिची लवकरच एंट्री होणार आहे. एकरूपची या मालिकेतील भूमिका कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील तिच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या मालिकेत अविनाशच्या प्रेयसीच्या भूमिकेत एकरूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील एकरूपचा लूकही खूप वेगळा आहे. तिच्या या नव्या भूमिकेसाठी ती खूपच उत्सुक असल्याचे ती सांगते.