Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘भाभीजी घर पर है'मध्ये नवीन अंगुरी भाभीची झाली एंट्री,कोण आहे 'ती' ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:55 IST

‘भाभीजी घर पर है' मालिकेत आता आणखी एक खास ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर सध्या विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करत आहेत. मालिकांच्या कथानकामधील रंगतदार वळण यामुळे काही मालिका रसिकांच्या मनात घर करुन गेल्या आहेत. अशाच मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पर है'. गेल्या अनेक वर्षापासून ही मालिका रसिकांचे भरघोस मनोरंजनक करत आहे. छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकं पात्र म्हणजे अंगुरी भाभी.  मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. त्यापैकी रसिकांची लाडकी म्हणजे अंगुरी भाभी साकारणारी अभिनेत्री शुभांगी अत्रेसुद्धा तितकीच लोकप्रिय ठरली आहे. या भूमिकेतून शुभांगी अत्रेने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे. 

भाभीजी घर पर है' मालिकेत आता आणखी एक खास ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या सुरु असलेल्या ट्रॅकनुसार कथेत अंगूरी भाभी तिवारीसह झालेल्या भांडणानंतर घर सोडून गेली आणि ती विभूतीच्या घरी राहायला लागलीय. तिवारीला बरे वाटावे म्हणून सक्सेना अंगूरी भाभीसारखी वेशभूषा करण्याचा निर्णय घेतो.अंगूरी भाभीसारखा दिसण्यासाठी तो अगदी तिच्यासारखीच साडी नेसतो. अंगुरी भाभी जसा मेकअप करते अगदी तसाच मेकअप करुन तो तिच्यासारखाच वेष धारण करतो. त्याच्या एंट्रीने अनेक मजेशीर वळण मालिकेत पाहायला मिळणार आहे. 

अंगूरी भाभी बनण्याच्या त्याच्या अनुभवाबद्दल बोलताना, सानंद वर्मा म्हणजेच अनोखे लाल सक्सेनाने सांगितले की, “मला अंगूरी भाभीचे सुंदर रूप नेहमीच आवडते. ती ज्या प्रकारची साडी आणि दागिने घालते त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसते. एक कलाकार या नात्याने मी नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्यास आणि नवीन लूकमध्ये दिसण्यासाठी उत्सुक असतो. हा ट्रॅक शूट करताना मला खूप मजा आली आणि मला आशा आहे की, रसिकांनाही हा नवीन ट्रॅक पाहण्यासाठी तितकीच मजा येईल. 

टॅग्स :भाभीजी घर पर है