Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नवीन अॅक्शन हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 13:26 IST

मालिकांमध्ये सध्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीही आपल्याला अॅक्शन दृश्य करताना पाहायला मिळत आहेत. नामकरण या मालिकेतील सयांतनी घोषने नुकतेच एक अॅक्शन ...

मालिकांमध्ये सध्या अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीही आपल्याला अॅक्शन दृश्य करताना पाहायला मिळत आहेत. नामकरण या मालिकेतील सयांतनी घोषने नुकतेच एक अॅक्शन दृश्य चित्रीत केले. या अॅक्शन दृश्यामध्ये तिला गुंडापासून एका लहान मुलीचा बचाव करायचा होता. पण हे अॅक्शन दृश्य चित्रीत करताना तिच्या मानेला लचक भरली. तिची मान प्रचंड दुखायला लागल्याने डॉक्टरांना सेटवर बोलवायला लागले. तिच्या मानेची नस दाबली गेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याविषयी सयांतनी सांगते, "मला खूपच दुखत असल्याने डॉक्टरांनी मला औषधं दिली आणि दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला. पण एक दिवस आराम केल्यानंतर मी लगेचच चित्रीकरण करायला सुरुवात केली."