Join us
Daily Top 2Weekly Top 5

​नेहाने दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:28 IST

मे आय कम इन मॅडम या मालिकेत नेहा पेंडसे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील एका दृश्यात तिला बिकनी घालायची ...

मे आय कम इन मॅडम या मालिकेत नेहा पेंडसे महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेतील एका दृश्यात तिला बिकनी घालायची होती. पण बिकनी घालण्यास नेहाने स्पष्ट नकार दिला. काहीही झाले तरी मी मालिकेत बिकनी घालणार नाही असे तिचे म्हणणे होते. याविषयी नेहा सांगते, "मला स्वमिंगसूट घालण्यास काहीही हरकत नव्हती. पण मी मालिकेत बिकनी घालावी असे प्रोडक्शन टीमचे म्हणणे होते. मी बिकनी घालण्यास तयार आहे किंवा नाही हे मला काहीही न विचारता या दृश्याचा मालिकेत समावेश करण्यात आला होता. मला माझ्या खऱ्या आयुष्यातही बिकनी घालायला आवडत नाही तर मी मालिकेत बिकनी का घालेन? स्विमिंग सूटवर एखादी ओढणी लपेटून मी स्विमिंग सूट घालते. पण त्यांना बिकनीतील दृश्यच हवे होते. मी नकार दिल्यावर माझ्या ड्युप्लिकेटने तो सीन करावा असे त्यांनी सुचवले. पण यामुळे मी मालिकेत बिकनी घातली हे लोकांपर्यंत जाणार होते. त्यामुळे मी या गोष्टीलादेखील आक्षेप दर्शवला. त्यानंतर चर्चा करून मालिकेच्या पटकथेतून ते दृश्यच वगळण्यात आले."