Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भाभी जी घर पर है'मध्ये नवी गोरी मेम नेहा पेंडसेने फॅन्सना केलं घायाळ, नवा प्रोमा आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 11:52 IST

आपल्या अदांनी तिने या भूमिकेला चार चांद लावले आहेत. 

गेल्या ५ वर्षांपासून सौम्या टंडन या मालिकेत काम करत होती. तिने अनिता भाभीची भूमिका लोकप्रिय केली होती. खाजगी कारणांमुळे काही दिवसांपूर्वीच सौम्याने ही मालिका सोडली होती, त्यानंतर तिची जागा नेहा पेंडसेने घेतली होती. अलीकडेच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये नेहा एका नवीन लूकमध्ये दिसली आहे. नेहाचा हा लूक खूपच जबरदस्त  आहे.  आपल्या अदांनी तिने या भूमिकेला चार चांद लावले आहेत. 

 नेहाने मानले सर्वांचे आभार मानतेशोचा हा नवीन प्रोमो नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अगदी वेगळ्या आणि स्टाईलमध्ये दिसते आहे. यामध्ये नेहाने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. व्हिडिओ शेअर करताना नेहाने लिहिले की, “कारण भाभीजी आता घरी आहे” मला ही भूमिका दिल्याबद्दल कोहलीचे धन्यवाद, मनोज जी माझी सपोर्ट सिस्टम आहेत. या रोलर कोस्टर राइडमध्ये मजा करण्यास मी तयार आहे. 

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी आणि हिंदी दोनही ठिकाणी काम केले आहे. 'बिग बॉस12' मध्ये ही नेहा दिसली होती. मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नेहा सिनेमातही झळकणार आहे. नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. तिच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर बराच काळ चर्चा होती. या व्हिडीओने तिच्या फॅन्सना आणि सोशल मीडियावर साऱ्यांनाच अक्षरक्षा वेड लावलं होतं. या व्हिडीओत ती वर्कआऊट करत असल्याचे पाहायला मिळत होते.

टॅग्स :नेहा पेंडसेभाभीजी घर पर है