Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा पेंडसेने व्यक्त केली ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 17:54 IST

​नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेतील तिच्या संजना या ...

​नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेतील तिच्या संजना या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दिला सुरुवात केली. तिने हसरते या मालिकेत साकारलेली व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. तसेच ये दुनिया है रंगीन या कॉमेडी मालिकेतदेखील तिने प्रमुख भूमिका साकारली होती. तिने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एकता कपूरसोबत काम केले होते.एकता कपूर ही छोट्या पडद्यावरची क्वीन मानली जाते. तिच्या बालाजी टेलिफ्लिम्सने आतापर्यंत अनेक हिट मालिका दिल्या आहेत. क्योंकी साँस भी कभी बहू थी, कहानी घर घर की, कसोटी जिंदगी की यांसारख्या मालिकांना आज अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकांची आजही आठवण काढली जाते. तिच्या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रचंड प्रसिद्धी मिळते. त्यामुळे तिच्यासोबत काम करण्याची अनेक कलाकारांची इच्छा आहे. नेहा पेंडसेने एकता कपूरच्या मानो या ना मानो, कॅप्टन हाऊससारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पुन्हा एकतासोबत काम करण्याची इच्छा असल्याचे तिने नुकतेच म्हटले आहे. नेहा सांगते, "मी एकता कपूरच्याच कार्यक्रमाद्वारे माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. एक बालकलाकार म्हणून मी त्यांच्या कार्यक्रमात झळकली होती. मला नंतरच्या काळातही त्यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून अनेक ऑफर आल्या होत्या. पण मी इतर कामात व्यग्र असल्याने आणि माझ्या तारखा न जुळल्याने मी या ऑफर्स नाकारल्या. अनेक वर्षांपासून मी बालाजीसोबत काम केलेले नाहीये. मला त्यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल."