Join us

​नेहा रोडीजमधून बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 16:32 IST

रोडीजच्या यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया झळकत आहे. पण तिने हा कार्यक्रम सोडला असल्याची सध्या चर्चा आहे. फायनल वोटिंगसाठी ...

रोडीजच्या यंदाच्या सिझनमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया झळकत आहे. पण तिने हा कार्यक्रम सोडला असल्याची सध्या चर्चा आहे. फायनल वोटिंगसाठी सगळ्या टीमचे प्रमुख एकत्र जमले होते. त्यावेळी व्हिजे गॅलिनने केलेल्या काही कमेंटमुळे नेहाला प्रचंड राग आला आणि तिला अश्रु अनावर झाले. केवळ नेहाच्या टीममध्ये फक्त दोन स्पर्धक उरले आहेत यावर गॅलिनने केलेली टीका नेहाला आवडली नसल्याचे म्हटले जात आहे. हे सगळे ऐकल्यावर नेहा रागाने तिथून निघून गेली आणि तिने आता हा कार्यक्रम सोडला असल्याची चर्चा आहे.