Join us
Daily Top 2Weekly Top 5

नेहा कक्करने प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर केला आणखी एक खुलासा, आता सांगितली डेट

By गीतांजली | Updated: December 19, 2020 15:06 IST

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने सोशल मीडियावर बेबी बम्पसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना धक्का दिला होता

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने सोशल मीडियावर बेबी बम्पसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना धक्का दिला होता. आता त्यांच्या या नवीन पोस्टमुळे चाहते अधिक संभ्रमात पडले आहेत. वास्तविक, नेहाने आता नवीन पोस्टमध्ये खुलासा केले आहे की तिचे नवीन गाणे रिलीज होत आहे. या गाण्याचे शीर्षक आहे 'ख्याल राख कर'. त्याने बेबी बम्पच्या फोटोसह नव्या गाण्याची घोषणा केली आहे.

22 डिसेंबर सांगितली डेटनेहा कक्करने या गाण्याचे कव्हर फोटो सोशल मीडियावर रिलीज केले आहे. हाच तो फोटो आहे ज्यावरुन नेहा प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली होती. तिने यासोबत डेट  22 डिसेंबर लिहिलेली आहे. कदाचित या तारखेला त्याचे गाणे रिलीज होत आहे. या गाण्यात रोहनप्रीत आणि नेहा कक्कर दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पोस्टरमध्ये 'खयाल राख्या कर' लिहिले आहे, ज्यावरुन लोकांनी नेहा प्रेग्नेंट असल्याचा तर्क लावला होते. त्यामुळे नेहा खरंच प्रेग्नेंट आहे की हे फक्त गाण्याच्या प्रमोशनसाठी पब्लिसिटी स्टंट होतं हे लवकरच कळले. 

24 ऑक्टोबरला झाले होते लग्न गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले. रोहनप्रीत सिंगच्या घरी नवोदित वधू नेहा कक्करचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यात नेहा आणि रोहनप्रीत ढोलच्या तालावर थिरकताना दिसले होते.

टॅग्स :नेहा कक्कर