Join us

नववर्षाच्या कार्यक्रमात नेहा कक्कर आणि बादशाह वाढवणार रोमांचकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:33 IST

अॅण्ड टीव्हीवरील ‘द व्हॉईस इंडिया किड्स’ हा गायनाचा लोकप्रिय रिअॅलिटी शो त्यातील उत्कृष्ट प्रतिभेमुळे लहरी निर्माण करीत आहे. ही ...

अॅण्ड टीव्हीवरील ‘द व्हॉईस इंडिया किड्स’ हा गायनाचा लोकप्रिय रिअॅलिटी शो त्यातील उत्कृष्ट प्रतिभेमुळे लहरी निर्माण करीत आहे. ही प्रतिभा केवळ प्रेक्षकांचीच नव्हे तर गायन क्षेत्रातील अनेकांची मने जिंकत आहे. आठवड्यापूर्वी सलमान खान आणि कॅतरिना कैफने या शोच्या सेटवर आले आणि शोमधील स्पर्धकांची प्रतिभा पाहून आश्चर्यचकीत झाले. तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी गायिका नेहा कक्कर आणि लोकप्रिय रॅपर बादशाह या शोमध्ये खास सादरीकरण करणार आहेत. व्हॉईस इंडिया किड्सच्या टिमसोबत नेहा कक्कर आणि बादशाह नववर्षाचा कार्यक्रम साजरा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बादशाह लोकप्रिय चार्टबस्टर मर्सी आणि डीजेवाले बाबू हे गाणे सुरुवातीला सादर करेल; तर नेहा कक्कर तू चिज बडी है मस्त मस्त हे गाणे सादर करणार आहे. हे दोघेही कलाकार लडकी ब्युटिफूल कर गयी चूल या गाण्यावर थिरकताना दिसतील.याबाबत बादशाहला विचारले असता, तो म्हणाला, “व्हॉईस इंडिया किड्समध्ये सहभागी होता आलं आणि पलकला पहिल्यांदाच भेटता आलं हे खूपच समाधानकारक आहे. या मुलांची प्रतिभा आश्चर्यकारक आहे आणि स्नेहा या शोमधील माझी सर्वात आवडती स्पर्धक आहे. प्रशिक्षकांची वेळ येते तेव्हा मी अधिक टिपणी करू शकत नाही. ते या क्षेत्रात खूप वर्षांपासून आहेत आणि ते निव्वळ अद्भूत आहेत.”नेहाला याबाबत विचारले असता ती म्हणाली, “व्हॉईस इंडिया किड्सची संकल्पना मला वैयक्तिक खूपच भावली आहे आणि नववर्षानिमित्तच्या खास कार्यक्रमात सहभागी होता आल्याने मला खूपच आनंद होत आहे. मला, वाटतं शोमधील मुले, परीक्षकांसह प्रत्येक जण त्यांचे काम चोखपणे बजावत आहे आणि माझी सर्वात आवडती स्पर्धक आहे नेहा. सर्वच परीक्षक सर्वोत्तम आहेत. मात्र, हिमेश रेशमिया माझे सर्वात आवडते आहेत. कारण, पूर्वी आम्ही दोघेही या शोचे परीक्षक होतो. तेव्हापासून माझे आणि त्यांचे जुने