Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाहबिझ दोराबजी साकारणार सावधान इंडिया या मालिकेत नकारात्मक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 13:46 IST

बहू हमारी रजनि_कांत या कार्यक्रमात मॅगी या भूमिकेत झळकलेली वाहबिझ दोराबजी प्रेक्षकांना आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ...

बहू हमारी रजनि_कांत या कार्यक्रमात मॅगी या भूमिकेत झळकलेली वाहबिझ दोराबजी प्रेक्षकांना आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बहू हमारी रजनि_कांत या कार्यक्रमानंतर आता ती सावधान इंडियामध्ये झळकणार आहे. त्यात ती एका नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. वाहबिझ या मालिकेत आपल्या पतीचा छळ करणाऱ्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तिचा पती कथ्थक डान्सर असल्याचे तिला आवडत नसल्याने ती त्याचा सतत छळ करते असे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. या भूमिकेविषयी वाहबिझ सांगते, "बहू हमारी रजनि_कांत या मालिकेत मी साकारत असलेल्या मॅगी या भूमिकेपेक्षा ही भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. तसेच या मालिकेतील माझा लूकदेखील खूपच वेगळा आहे. मी प्रेक्षकांना  मी या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तुम्ही ज्यावेळी नकारात्मक भूमिका साकारत असता त्यावेळी तुम्हाला ती भूमिका साकारण्याआधीदेखील तितकेच गंभीर व्हावे लागते. मी आतापर्यंत नकारात्मक भूमिका साकारलेली नसल्याने ही खूपच आव्हानात्मक भूमिका आहे. पण एक कलाकार म्हणून तुम्ही सगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे आवश्यक असते असे मला वाटते. मला नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारायला खूप आवडतात. त्यामुळे मी चांगल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्यासाठी तयार आहे." वाहबिझ दोराबजीने प्यार की ये एक कहानी, सरस्वतीचंद्र यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. वाहविझने प्यार की ये एक कहानी या मालिकेतील सहकलाकार विवियन डिसेनासोबत लग्न केले होते. पण काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या मीडियात चांगल्याच गाजल्या होत्या. ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचेही म्हटले जात होते.