Join us

नीलांजनाचा परफॉर्मन्स पाहून विशालने केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 15:00 IST

इंडियन आयडॉल 10 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील संगीत रिऑलिटी शोमधील स्पर्धकांच्या अप्रतिम परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

इंडियन आयडॉल 10 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील संगीत रिऑलिटी शोमधील स्पर्धकांच्या अप्रतिम परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या वीकएंडला ‘जनता की फर्माइश’ भाग असेल, ज्यात कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट 8 स्पर्धकांचे चाहते त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सेटवर येतील. गोड गळ्याची गायिका नीलांजना हिने ‘मोह मोह के धागे’ हे प्रसिद्ध गीत गाईले, जे ऐकून परीक्षक मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी उभ्याने टाळ्या वाजवून तिचे कौतुक केले. विशाल दादलानी तर इतका प्रभावित झाला होता की, थेट मंचावर जाऊन त्याने तिचा चरणस्पर्श केला. हा ‘चाहता विशेष’ भाग असल्याने नीलांजनाचे चाहते, विजय तलरेजा आणि प्रीती तलरेजा हे जोडपे तिला प्रत्यक्ष मंचावर परफॉर्म करताना पाहून अक्षरशः भांबावून गेले. त्यांनी तिला प्रेमाचे प्रतीक म्हणून सोन्याची एक चैन भेट दिली. नीलांजनाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर नेहा कक्कड म्हणाली, “नीलांजनाचा आवाज खूप गोड आहे आणि ती खूपच सुंदर गाते. असे वाटते जणू ती मा सरस्वतीची कन्याच आहे.”  नीलांजना म्हणाली, “विशाल सर आणि नेहा आणि अन्नू सरांनी केलेल्या कौतुकाने मी अगदी भारावून गेले आहे. हा भाग आमच्यासाठी खूप खास आहे कारण आमचे चाहते आज सेटवर आलेले आहेत. मला माझ्या चाहत्यांकडून सोन्याची चेन मिळाली आहे पण मी गात असताना त्यांच्या चेहर्‍यावर जो आनंद दिसत होता, त्यामुळे मला अधिक आनंद झाला आहे. हा दिवस नेहमी माझ्या स्मरणात राहील कारण या दिवसाने मला सेलिब्रिटींना कसे वाटत असेल याची जाणीव करून दिली.”

टॅग्स :इंडियन आयडॉल