Join us
Daily Top 2Weekly Top 5

नवाजुद्दिन सिद्दिकी आणि स्वरा भास्कर ह्या कारणामुळे आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 06:30 IST

नवाजुद्दीन सिद्दीकी व स्वरा भास्कर हे दोघे नुकतेच एका मंचावर दाखल झाले होते.

स्टार प्लस वाहिनीवरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेत विनोदाचा बादशहा सुनील ग्रोव्हर आपल्या जिजाच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांची चांगलीच करमणूक करीत आहे. २०१८ मधील प्रमुख घटनांचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या आगामी भागात नामवंत अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर नुकतेच सहभागी झाले होते. या दोन्ही कलाकारांनी २०१८ हे वर्ष गाजविले होते.या कार्यक्रमाशी जवळून संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले, “या आगामी भागात अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हे सेलिब्रिटी अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यापूर्वी नवाजुद्दिन आणि सुनील ग्रोव्हर हे एकत्रच राहात होते. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची रियुनियन झाली म्हणायची.

यावेळी नवाझुद्दिनने सुनीलचे काही किस्से ऐकविले आणि या दोघांनी एकत्रितपणे केलेल्या काही धमाल घटनांच्या कथाही सांगितल्या. त्यांना स्वरा भास्करने साथ देत कार्यक्रमात आणखी रंगत आणली. तिने फराह खानने बसविलेल्या 'तरीफा' गाण्यावर नृत्यही केले. यावेळी ती म्हणाली की, या गाण्याच्या वेळी मी सोडून फराह अन्य सर्वांची उत्तम नृत्याबद्दल प्रशंसा करीत असे.”

अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने गतवर्षी प्रेक्षकांवर आपला चांगलाच ठसा निर्माण केला होता. या भागात त्यांनी आपल्या खासगी जीवनातील काही मजेदार किस्से सादर केले. हा भाग ‘कानपूरवाले खुराणाज’मध्ये शनिवार-रविवारी रात्री 10.00 वाजता पाहायला मिळेल.

टॅग्स :कानपुरवाले खुराणाज्नवाझुद्दीन सिद्दीकीस्वरा भास्कर