Navri Mile Hitlarla: छोट्या पडद्यावरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. ही मालिका त्यातील एकापेक्षा एक कलाकार, कथा आणि मालिकेत येणारे ट्विस्ट यामुळे लोकप्रिय आहे. या मालिकेतील एजे आणि लीलाच्या जोडीने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट अभिराम उर्फ एजेची भूमिका साकारतो आहे. तर अभिनेत्री वल्लरी विराज 'लीला' च्या भूमिकेत दिसते आहे. दरम्यान, गेल्यावर्षी १८ मार्चपासून 'नवरी मिळे हिटलरला' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. परंतु मागील काही दिवसांपासून ही लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या होत्या. याबाबत एक महत्वाची अपडेट आता समोर आली आहे.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजेंची सून म्हणजे दुर्गाची भूमिका असणारी अभिनेत्री शर्मिला राजाराम याबद्दल मोठा खुलासा केला आहे. नुकतंच शर्मिलाने इन्स्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतलं. त्यावर एका चाहतीकडून तिला प्रश्न विचारण्यात आला की, नवरी मिळे हिटलरला खरंच बंद होणार का यावर अभिनेत्रीने मालिका संपणार असल्याचं या बातम्यांना दुजोरा दिला आहे. याशिवाय या मालिकेला एक्स्टेंशन दिलं जाणार आहे असंही विचारण्यात आलं. त्यावर नाही असं उत्तर देत अभिनेत्रीने स्पष्टपणे सांगितलं आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून चाहत्यांमध्ये नवरी मिळे हिटलरला मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा सुरु होती. त्यामुळे मालिका रसिकांमध्ये नाराजीचा उमटला आहे. अगदी अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या या मालिकेने झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात अनेक पुरस्कार पटकावले होते.